शरीरामध्ये काही गडबड झाली की शरीर त्याचे संकेत देऊ लागतं. लघवीदेखील त्याचे एक माध्यम आहे.
शरीरातील अनेक आजार तुमच्या लघवीच्या माध्यमातून कळू शकतात.
अनेकदा लघवीत खूप फेस दिसतो, हे आजाराचे लक्षण असू शकते.
लघवीमध्ये सतत फेस येणे हे किडनी खराब असल्याचे लक्षण असू शकते.
शरीरात पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन होऊ लागते. यानंतर लघवीमध्ये फेस येऊ लागतो.
यूटीआय एक गंभीर आजार आहे, ज्या कारणामुळेदेखील लघवीमध्ये फेस दिसू लागतो.
लघवीमध्ये फेस दिसणं हे मधुमेहाचेदेखील लक्षण असू शकते.
ब्लॅडर फूल झाल्याने लघवीमध्ये फेस दिसू शकतो.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)