दूध आणि केळ एकत्र खाणे आरोग्यासाठी चांगले की वाईट?
नेहा चौधरी
Jul 08,2024
आरोग्य तज्ज्ञांनुसार काही अन्नपदार्थंचे कॉम्ब्रेशन हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतं.
मग दूध आणि केळ एकत्र खाणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगल की वाईट याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या.
रिकाम्या पोटी सकाळी तुम्ही दूध आणि केळी एकत्र खाऊ शकता. यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.
वजन वाढवायचं असेल तर तुम्ही केळ आणि दुधाचं सेवन एकत्र करु शकता.
दूध आणि केळी एकत्र खाल्ल्याने शरीरात पोटॅशियमचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.
दूध आणि केळीचं एकत्र सेवन केल्यास कॅल्शियम आणि प्रथिनेही मिळतात. जे आपल्या हाड मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी दूध आणि केळी घेतल्यास पचनसंस्थेसाठी फायदा मिळतो.
मधुमेही रुग्णांसाठीही तज्ज्ञ दूध आणि केळीच सेवन फायदेशीर सांगतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)