चाळीशीनंतर खावा 'ही' 5 फळं; चेहऱ्यावर वाढत्या वयाचं एकही निशाण दिसणार नाही

म्हातारपण ही एक नैसर्गिक प्रक्रिया

म्हातारपण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी म्हातारपण येणार आहे. पण जर वाढत्या वयाची लक्षणं शरिरावर दिसत नसतील तर त्याला हेल्दी एजिंग म्हटलं जातं.

5 फळांबद्दल जाणून घ्या

निसर्गाने आपल्याला अशी अनेक फळं दिली आहेत, जी आरोग्यासाठी चांगली असतात तसंच म्हातारपणाचा वेग कमी करण्यात मदत करतात. अशाच 5 फळांबद्दल जाणून घ्या ज्याचं नियमित सेवन शरिरावर म्हातारपणाच्या खुणा दाखवत नाहीत.

डाळिंब

डाळिंब त्वचेला तरुण ठेवण्यात मदत करतं. यामध्ये पॉलिफेनोल्स नावाचे एंटीऑक्सिंडेट असतं जे धोकादायक किरणांपासून त्वचेची रक्षा करतात.

डाळिंबाचं सेवन कोलेजनची निर्मिती वाढवतं आणि नवे स्कीन सेल्स तयार करण्यात मदत करतं. ज्यामुळे चेहऱ्यावर सूरकुत्या दिसत नाहीत.

पपई

पपई विटामिन्स, मिनरल्स आणि एंजाइम्स असणारं गोड फळ आहे, ज्यामध्ये विटॅमिन ए, सी आणि ई असतं जे त्वचेला तरुण ठेवतं.

पपईतील एंजाइम त्वचेतील मृत पेशी हटवतं. रोज पपई खाल्ल्याने त्वचा सुंदर आणि नाजूक होते.

किवी

किवीचं सेवन केल्याने कोलेजन वाढतं. यामध्ये विटॅमिन सी भरपूर असतं, जे त्वचेला तरुण ठेवण्यात मदत करतं. यामध्ये विटॅमिन ई आणि अनेक अँटीऑक्सिडेंट्स असतात जे चेहऱ्यावर सूरकुत्या येऊ देत नाही.

एवोकाडो

एवोकाडो त्वचेसाठी फार चांगलं मानलं जातं. हे तुमची स्कीन सतत हायड्रेटेड ठेवतं.

एवोकाडो विटॅमिन ई आणि सी चा चांगला स्त्रोत आहे, जे स्कीनमधील कोलेजन वाढवतं. अँटी एजिंग फळात हे सर्वात चांगलं मानलं जातं.

कलिंगड

कलिंगडमध्ये लाइकोपिन नावाचं अँटीऑक्सिडेंट असतं जे त्वचेला सूर्याच्या धोकादायक किरणांपासून वाचवतं. कलिंगड खाल्ल्याने स्क्रीनचं हायड्रेशन वाढतं आणि तुम्ही तरुण दिसता.

VIEW ALL

Read Next Story