Health News : रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?
Drinking Water before sleeping : असं म्हणतात की, पाणी हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. शरीरात पाण्याची पातळी कमी होताच अनेक संकटांची चाहूल लागते.
थोडक्यात पाणी प्यायल्यानं कोणतंच नुकसान होत नाही. हो पण, इथंही काही गोष्टींची काळजी घेतली जाणं मात्र अतिशय महत्त्वाचं ठरतं.
असं म्हणतात की, झोपण्यापूर्वी पाणी पिणं शरीरासाठी योग्य ठरत नाही. असं केल्यानं तुम्ही हायड्रेट राहता, मायग्रेन आणि डोकेदुखीपासूनही आराम मिळतो. पण, ही आरोग्यदायी सवय नाही.
झोपण्याआधी पाणी प्यायल्यास तुम्हाला वारंवार लघुशंकेसाठी उठावं लागतं, ज्यामुळं तुमची झोप मोडते. अशानं नवा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असतो.
झोप अपूर्ण राहिल्यामुळं तुम्हाला उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं, वजन वाढणं अशा समस्या सतावू लागतात.
झोपण्यापूर्वी 1 तास आधी पाणी पिणं टाळावं. असं केल्यानं तुमचं निद्राचक्रही तुटत नाही आणि शारीरिक व्याधी तुमच्या आजुबाजूलाही फिरकत नाहीत.
जेवणानंतरही लगेचच पाणी पिऊ नये. ही सवय झोपेसाठी घातक ठकू शकते. शिवाय चहा प्यायल्यानंतर किंवा एखादं फळ खाल्ल्यानंतरही पाणी पिऊ नये.
राहिला मुद्दा पाणी कधी प्यावं, तर झोपण्याआधी किमान दीड ते 2 तासांपूर्वी पाणी प्यावं. यामुळं तुमच्या झोपेत कधीच व्यत्यय येत नाही आणि याचे सकारात्मक परिणामच होतात.