पावसाळा आणि चहा यांच एक वेगळच नातं आहे.
आज जवळपास प्रत्येक भारतीयाची सकाळ चहाशिवाय होत नाही.
पण तुम्हाला माहित आहे का सकाळी रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
जर तुम्हीसुद्धा रोज सकाळी चहाचे सेवन करत असाल तर तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने तणाव निर्माण होतो आणि झोपेच्या समस्या उद्धवू शकतात.
त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने पचनक्रिया बिघडते याचे कारण म्हणजे चहामध्ये असलेले कॅफिन. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)