बदाम आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अनेकजण भिजवलेल्या बदामाची सालं खाण पसंत करत नाहीत.

पण तुम्हाला माहितीये का भिजवलेल्या बदामाच्या सालांपासून तुम्ही चटणी करु शकता.

चटणी बनवण्यासाठी तव्यावर एक चमचा तूप टाका आणि त्यात एक कप बदामाची सालं व शेंगदाणे टाका.

त्यानंतर एक कप उडीद डाळ टाका आणि हे मिश्रण चांगलं परतवून घ्या.

सर्व साहित्य थंड झाल्यानंतर त्यात २-३ हिरवी मिर्ची, लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि लिंबूचा रस आणि स्वादानुसार मीठ टाकून मिश्रण वाटून घ्या.

चटणी वाटून झाल्यानंतर तूप, कडीपत्ता, लाल मिरचीची तेलात फोडणी देऊन चटणीला तटका द्या.

बदामाच्या सालांपासून बनवलेली चटणी फारच पौष्टिक आहे.

VIEW ALL

Read Next Story