उपवास केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो?

Aug 06,2024


कर्करोग हा जीवघेणा आणि धोकादायक आजार आहे. आजही यावर उपचार करणं कठीण आहे.नुकताच एका संशोधनातून असा दावा करण्यात आलाय की, उपवास केल्याने कर्करोग दूर होऊ शकतो.


मेमोरियल स्लोन केंटरिंग कॅन्सर सेंटरने केलेल्या संशोधनात उपवासामुळे कर्करोगाच्या पेशींवर परिणाम होतो.


उपवास केल्याने शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करते. यामुळे नैसर्गिक पेशी व्यवस्थित काम करतात.


हे संशोधन उंदरावर करण्यात आले होते ज्यामध्ये उपवासामुळे नैसर्गिक किलर पेशींची कार्यक्षमता वाढते. उपवासाच्या दिवशी या पेशी साखरऐवजी चरबी खातात, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होण्यास मदत होते.


2012 मध्ये उंदरावर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की अल्पकालीन उपवास केमोथेरपीच्या दुष्परिणामांपासून निरोगी पेशींचे संरक्षण करू शकतो.


त्याचबरोबर जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटरने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, अधूनमधून उपवास केल्याने फॅटी लिव्हर आणि कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story