दोडक्याची भाजी सगळ्यांनाच आवडते असं नाही. त्यामुळं नवनवीन पद्धतीने भाजी करण्यात येत. पण तुम्हाला माहितीये का दोडक्यांच्या सालांचीही छान चटणी बनवण्यात येते.
दोडक्याच्या सालीपासून खमंग व चटपटीत चटणी बनवता येते. ही चटणी कशी बनवायची याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.
दोडक्याची साले-शिरा, लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, जिरे, मीठ
नंतर ती एका प्लेटमध्ये काढून ठेवा. त्यानंतर पॅनमध्ये बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची आणि जिरे आणि एक चमचा तेल टाकून ते भाजून घ्या.
दोडक्याची साले आणि वरील साहित्य थंड झाल्यावर मिक्स करुन घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला.
नंतर हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. ही चटणी एका डब्यात काढून घ्या व गरमागरम भाकरीसोबत खा.