5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

पाकिस्तान संघ भारतात दाखल झाला असून, आपला पहिला सराव सामनाही खेळला आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाने फार उशिरा व्हिसासाठी अर्ज केला होता. दरम्यान त्यांना अखेर व्हिसा मिळाला आहे.

यादरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून एक मोठी मागणी केली आहे.

पीसीबीने पाकिस्तानी प्रसारमाध्यमं प्रतिनिधी आणि चाहत्यांनी वर्ल्डकप पाहण्यासाठी व्हिसा देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान बीसीसीआय सूत्रांनुसार, पाकिस्तानी पत्रकारांना गृह, परराष्ट्र आणि क्रिडा मंत्रायलयाकडून व्हिसा मिळणं गरजेचं आहे.

पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजत आहे.

दुसरीकडे पीसीबीने, आतापर्यंत पत्रकार आणि चाहत्यांनी व्हिसा पॉलिसीबद्दल काही माहिती देण्यात आलं नसल्याचं म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story