घरातील पार्टी, बार, पब किंवा हॉटेलमध्येही दारूसोबत चवीला अनेक खाद्यपदार्थ दिले जातात. पीत असतानाही लोक खातात. पण ,तुम्हाला माहित आहे का की असे काही खाद्यपदार्थ आहेत जे अल्कोहोलसोबत किंवा नंतर सेवन करू नये कारण ते आरोग्यावर खूप वाईट परिणाम करू शकतात.
मद्यपान करताना लोक अनेकदा शेंगदाणे किंवा काजू खाणे पसंत करतात. पण, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की या गोष्टींचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही.
मद्यपान करताना किंवा नंतर शेंगदाणे आणि काजू दोन्ही खाऊ नका. कारण त्यानं शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि तुमच्या आरोग्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो.
अल्कोहोल घेतल्यानंतर दुग्धजन्य पदार्थ किंवा दुधाचे सेवन करणे टाळा. नाहीतर तुम्हाला पचनक्रियेसंबंधी विकार उद्भवू शकतात.
अल्कोहोलमध्ये सोडा किंवा कोल्ड्रिंक मिक्स करून पिणे शरीरासाठी हानिकारक आहे. म्हणून, त्या ऐवजी, तुम्ही अल्कोहोलमध्ये पाणी किंवा बर्फ मिसळून ते सेवन करू शकता.
मद्यपान करताना किंवानंतर चिप्स किंवा क्रिस्पी स्नॅक्सचे सेवन करू नका. तसेच तळलेले मोमोज किंवा चिकन टाळा. यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
दारू पिल्यानंतर गोड खाण्याची इच्छा वाढते. अशा परिस्थितीत, दारू पिल्यानंतर लगेच मिठाई खाणे टाळा. कारण मद्यपान केल्यानंतर गोड खाल्यास ते आपल्यासाठी कोणत्याही विषापेक्षा कमी नसते.
मद्यपान करणं ही गोष्ट चुकीची आहे. त्यामुळे आरोग्यावर किती वाईट परिणाम होतात हे जाणून घ्या आणि मद्यपान करणं बंद करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.) (All Photo Credit : Freepik)