काही पदार्थांचे एकमेकांसोबत सेवन करणे हे शरीरासाठी तोट्याचे असते. असे पदार्थ कोणते? याबद्दल जाणून घेऊया.
तूप आणि मध एकत्र खाऊ नका. यामुळे शरिराला तोटा होईल.
फणसाच्या भाजीसोबत दारुचे सेवन करु नका.
कलिंगड सर्वजण आवडीने खातात पण त्यासोबत पाणी पिऊ नका.
सकाळी केळे खाल्ल्याने पोट साफ होते पण त्यासोबत मठ्ठा पिऊ नका.
मच्छी आणि दूध एकत्र पिऊ नका. यामुळे चेहऱ्यावर डाग येतील.
आंबट फळे खाल्ल्यानंतर दूध पिण टाळावे.
मधामुळे शरिराचे अनेक आजार दूर होतात. पण त्यासोबत द्राक्षे खाऊ नका.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)