थोडक्यात रडणं हे काही कमकुवतपणाचं लक्षण नाही. त्यामुळं ऱडा... निर्धास्त रडा!
मनात भावना साठवून त्यामुळं होणारी घुसमट आणि येणारं दडपण, तणाव या सर्व गोष्टी रडण्यामुळं क्षणात दूर होतात. त्यामुळं तुम्ही भावनिकदृष्ट्याही कणखर होता.
अनेकांनाच रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही. अशा मंडळींना रात्री रडू आल्यास त्यांना चांगली झोप लागते.
जेव्हाजेव्हा तुम्ही रडता तेव्हातेव्हा डोळ्यात असणारे असंख्य बॅक्टेरिया अश्रूंवाटे बाहेर पडतात आणि डोळेही स्वच्छ राहतात. बऱ्याचदा अनेक संसर्गही यामुळं दूर होतात.
जेव्हाजेव्हा आपण तणावात असतो तेव्हातेव्हा बौद्धिक पातळीवरही ताण वाढतो. अशा वेळी रडल्यास डोकं हलकं होतं. आणि शरीरात ऑक्सीटॉसिन, इंडोरफिर केमिकल्स रिलीज होतात.
कमकुवत मानसिक स्थिती असणारी मंजळी सतत रडक असतात असा जर तुमचा समज असेल तर, तो आताच दूर लोटा.
रडा लोकहो....; फायदे इतके की आनंदातही येतील अश्रू