थंडीच्या दिवसांत आरोग्याकडे खासकरुन त्वचेकडे लक्ष देण्याची फार गरज असते.
या दिवसांत त्वचा कोरडी पडते,ओठ फाटतात.
ओठ फाटल्यानंतर ओठांवरील निघालेली त्वचा काढल्यावर ओठ आणखीन फाटण्याची शक्यता असते.
या काही घरगुती टिप्स आहेत ज्यामुळे तुम्ही ओठांची काळजी घेऊ शकता.
फाटलेल्या ओठांना सॉफ्ट आणि मऊ ठेवण्यासाठी ओठांवर मध लावा.
ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल लावल्यास फुटलेल्या ओठांना आराम मिळतो.
घराबाहेर पडताना ओठांना लीप लोशन किंवा लीप बाम लावू शकता.
थंडीत अतिशय थंड पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा जास्त ड्राय पडू शकते.