कोणी दिली ही माहिती?

एम्सच्या ऍनेस्थेसिया विभागाचे प्राध्यापक आणि इंडियन रिसुसिटेशन सोसायटीचे सचिव डॉ. राकेश गर्ग यांनी ही माहिती दिली आहे.

Oct 04,2023

सीपीआर देण्याचे प्रशिक्षण

डॉ. राकेश गर्ग यांची संस्था देशभरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, संमेलने, विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना सीपीआर देण्याचे प्रशिक्षण देते.

कमी लोकांना याबद्दल माहिती

सीपीआर अर्थात कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. वेळेवर सीपीआर न दिल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे.

सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

तीन हजार रूग्णांच्या सर्वेक्षणानंतर असे आढळून आले की, रूग्णालयात आणण्यापूर्वी केवळ 2 ते 9 टक्के रूग्णांना जवळच्या व्यक्तीने सीपीआर दिला होता.

असा दिला जातो सीपीआर

तुमचे दोन्ही हात रुग्णाच्या छातीच्या खालच्या मध्यभागी ठेवा. दर मिनिटाला 100 ते 120 वेळा छातीवर जोरात दाबा. या दरम्यान रुग्णाची छाती दोन इंच दाबली पाहिजे. रुग्ण प्रतिसाद देत आहे की नाही ते पहा. मदत येईपर्यंत सीपीआर सुरू ठेवा.

योग्य सीपीआर शिकणे गरजेचं

डॉक्टरांच्या मते सीपीआर मॉडेल शिकणे महत्त्वाचे आहे. चुकीचा सीपीआर देणे हे काहीच न करण्यासारखं आहे. त्यामुळे त्याचे योग्य प्रशिक्षण घेतले पाहिजे.

योग्य सीपीआर शिकणे गरजेचं

डॉक्टरांच्या मते सीपीआर मॉडेल शिकणे महत्त्वाचे आहे. चुकीचा सीपीआर देणे हे काहीच न करण्यासारखं आहे. त्यामुळे त्याचे योग्य प्रशिक्षण घेतले पाहिजे.

15 मिनिटांत शिकू शकता सीपीआर

सीपीआरची प्रक्रिया 15 मिनिटांत शिकता येते. प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला हे माहित असले पाहिजे. (सर्व फोटो - Freepik.com)

VIEW ALL

Read Next Story