अनेक जणांना भेंडी यासाठी आवडत नाही कारण ती केल्यानंतर त्यात बुळबुळीतपणा राहातो. तो चिकटपणा अनेकांना पोळीसह खाताना आवडत नाही.
तर काही जणांना कुरकुरी भेंडी रेसिपी करायची असते पण भेंडी मऊ पडते. पण यासाठी काही खास आणि सोप्या टिप्स आहेत.
भेंडीची भाजी पौष्टीक असते, त्यामुळे ती लहान मुलांनाही खायला देतात. पण अनेकदा भेंडीची भाजी बनवताना ती चिकट राहते.
त्यामुळे गृहीणींना भेंडीची भाजी बनवताना भेंडतला चिकटपणा कसा जाईल याची समस्या सतावत असते.
मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक सोपी ट्रीक. ही ट्रीक वापरल्यास भाजीचा चिकटपणा कमी होईल.
भेंडीच्या भाजीतला चिकटपणा दूर करण्यासाठी लिंबाचा वापर करा.
भेंडी कापल्यानंतर थोडावेळ ती सुकवण्यासाठी हवेवर ठेऊन द्या.
भेंडीची भाजी शिजवताना त्यात कांदा आणि मसाले टाकल्यानंतर एक लिंबू पिळून टाका
लिंबात असलेल्या अॅसिटीक गुणधर्मामुळे भेंडीचा चिकटपणा दूर होतो.