पारंपरिकतेला द्या हटके टच; गणेशोत्सवासाठी मिळवा खास फेस्टिव्ह लूक

बाप्पाचे आगमन अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपले आहे. बाप्पाच्या आगमनाची सगळी तयारी झाली असेलच. आता जरा स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.

घरात बाप्पा असताना आपणही स्टायलिश दिसावं असं सगळ्याच महिलांना वाटतं. यावेळी गणेशोत्सवात नवीन पारंपारिक फॅशन कोणती करु शकता, हे आपण जाणून घेऊया.

मॉर्डन आणि पारंपारिक लूक हवा असलास प्लेन साडीवर काठाची बोर्डर उठून दिसेल. या साडीवर हेवी झुमका आणि छोटी टिकली लावल्यास तुमचा लूक परिपूर्ण दिसेल.

मोनोक्रोम साडीसोबतही स्मोकी मेकअपचा लुकही तुमच्यावर खुलून दिसेल.

पारंपारिक लूकमध्ये काही ट्विस्ट द्यायचा असल्यास प्लाझो पॅन्टवर क्रॉप टॉप परिधान करुन त्यावर एथनिक जॅकेट वेअर करा. हल्ली बाजारात पैठणी व खणाचे जॅकेटही उपलब्ध आहेत.

सिंपल आणि सोबर लुक हवा असल्यास प्रिंटेट अनारकली सूटवर नेटचा दुप्पटा उठून दिसेल.

पारंपारिक लूक हवा असेल तर मराठमोळी पैठणी ही नेहमीच हिट असते. फक्त थोड्या हटके पद्धतीने साडी नेसून तुम्ही वेगळा लूक करु शकता. किंवा पैठणीच्या साडीचा ड्रेसदेखील तुम्ही घेऊ शकता

VIEW ALL

Read Next Story