आपल्या दररोजच्या आहारामध्ये अनेक विविध पदार्थ असतात. मात्र यामध्ये भात आणि चपातीचा समावेश हमखास असतो.
वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये भात किंवा चपाती यांच्यापैकी कशाचा समावेश करावा?
लोकांचा असा समज आहे की, भातामुळे वजन वाढतं तसंच पोट सुटतं.
चपाती आणि भात खाल्ल्यानंतर त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं आणि ग्लुकोज शरीराला ऊर्जा देते
भात आणि चपाती यांच्यातील पौष्टिक घटकांचं मूल्य जवळपास सारख असल्याने तुम्हाला आहारात जे आवडतं ते समावेश करू शकता.
भातामध्ये चपातीपेक्षा जास्त कर्बोदके असतात. त्यामुळे भात खाल्ल्याने पोट लवकर भरतं.
दुसरीकडे चपातीमध्ये भातापेक्षा जास्त प्रोटीन आणि फायबर असतं, ज्यामुळे पोट थोडा जास्त काळ भरलेलं राहतं.
100 ग्रॅम गव्हाच्या पिठामध्ये 76 ग्रॅम कर्बोदक, 10 ग्रॅम प्रथिने आणि 1 ग्रॅम चरबी असते.
100 ग्रॅम तांदळामध्ये 28 ग्रॅम कर्बोदक, 2.7 ग्रॅम प्रथिने आणि 0.3 ग्रॅम चरबी असते.