तुम्हाला तुमच्या पोटाचा घेर कमी करायचा असेल तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये रात्रीच्या वेळातील काही सवयी तुम्हाला कायमच्या सोडाव्या लागतील. या सवयी कोणत्या हे पाहूयात...

दूध पित असाल तर सावध

झोपण्याच्या आधी गरम दूध पिणं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरु शकतं. कारण गरम दुधामुळे शरीरामधील कॅलरीचं प्रमाण वाढतं.

पोटाचा घेर कमी होत नाही

शरीरामधील कॅलरी वाढल्याने पोटाचा घेर आणि स्थूलपणा कमी होत नाही.

डाएट मॅनेज करा

त्यामुळेच रात्री गरम दूध पीत असाल तर तुम्हाला तुमचा डाएट मॅनेज करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला कॅलरी नियंत्रणात ठेवता येतील.

मोबाईलमुळेही वाढतं वजन

झोपण्याआधी तुम्ही मोबाईल स्क्रोअल करत बराच वेळ पडला असेल तर याचाही तुमच्या वजनावर परिणाम होतो.

रात्री उशीरापर्यंत मोबाईलवर राहिल्याने...

रात्री उशीरापर्यंत मोबाईलवर राहिल्याने झोप पूर्ण होत नाही आणि शरीरामधील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं.

..अन् त्यामुळे वजन वाढतं

हार्मोन्सचं संतुलन बिघडल्याने शरीरामधील मेटाबायोलिझम मंदावतं. मेटाबायोलिझम मंदावल्याने वजन वाढतं.

चहा आणि कॉफीही कारणीभूत

चहा आणि कॉफीमध्ये कॅफेनचं प्रमाण असतं. एका अभ्यासानुसार चहा किंवा कॉफीचं सेवन आणि झोपेमध्ये किमान 6 तासांचं अंतर हवं.

चांगली झोप लागत नाही अन् वजनावर परिणाम

कॅफेनचं सेवन आणि झोपेमध्ये 6 तासांपेक्षा कमी अंतर असेल तर चांगली झोप लागत नाही आणि त्याचा परिणाम वजनावर होतो.

झोप पूर्ण झाली नाही तर...

हार्डवर्ड हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार झोप पूर्ण झाली नाही तर हार्मोन्सचं संतुलन बिघडते.

स्थूलपणाचा समस्या

हार्मोन्सचं संतुलन बिघडल्याने शरीराचं वजन वाढतं आणि स्थूलपणाचा समस्या निर्माण होते.

टीव्ही पाहत बसणे चुकीचे

रात्री उशीरापर्यंत टीव्ही पाहत बसणेही चुकीचे आहे. टीव्ही पाहता पाहता स्नॅक्स खाण्याची सवय लागते.

वजन वाढण्याची शक्यता अधिक असते

झोपण्यापूर्वी टीव्ही पाहताना स्नॅक्स खाल्ल्याची सवय जडल्यास वजन वेगाने वाढण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.

शरीरातील फॅट्सचं प्रमाण वाढतं

जेवल्यानंतर लगेच झोपल्यास अन्नाचं योग्य पद्धतीने पचन होत नाही. यामुळे शरीरातील फॅट्सचं प्रमाण वाढतं.

झोपण्यात आणि जेवण्यामध्ये अंतर

झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी जेवण केलं पाहिजे असं सांगितलं जातं.

अनेकजण करतात या चुका

या पाचपैकी अनेक गोष्टी आपल्यातील अनेकजण नक्कीच करत असणार. पण या गोष्टींचा वजनावर परिणाम होतो हे अनेकांना ठाऊक नसतं.

VIEW ALL

Read Next Story