हृदय विकारासारख्या गंभीर आजाराचा धोका आता पौढांबरोबरच तरुणांनाही सतावत आहे.
जंक फूडच्या वाढत्या सेवनामुळं शरिरात पोषकतत्वाची कमतरता निर्माण होते. यामुळं आता टीनएजर्सही हृदयविकाराच्या विळख्यात अडकत चालले आहेत.
आजकाल कोवळ्या वयातील मुलांनाही स्ट्रेस जाणवतो. वाढत्या तणावाबरोबरच हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो.
कोविड १९ आणि लॉकडाऊनमुळं विद्यार्थ्यांचे पूर्ण शेड्युल चेंज झालं होतं. त्याचबरोबर त्यांचे रुटिनही बिघडले होते. बिघडलेल्या रुटीनमुळंही हार्ट अटॅकच्या प्रकरणात वाढ झाल्याचे दिसत आहे.
रात्री उशीरापर्यंत फोनचा वापर केल्यानेही लहान मुलांच्या मेंटल हेल्थवर परिणाम होते. त्यामुळंही हार्ट अटॅकचा धोका संभवू शकतो.
तरुणांमध्ये दारू आणि ड्रग्जचे वाढते प्रमाण हृदयासाठी हानिकारक आहे.
धुम्रपानामुळे आपल्या हृदयावर गंभीर परिणाम होतोत. शरीरातील रक्तवाहिन्या अरुंद होतात ज्यामुळे ब्लॉकेज होते त्यामुळं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो
काही पालक आपल्या पाल्याच्या या चुकांकडे लक्ष देणे टाळतात.
हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजारापासून आपल्या पाल्याला वाचवण्यासाठी आत्तापासूनच त्यांच्यावर नजर ठेवणे गरजेचे आहे.