Best Foods For Diabetes: मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या समस्यांवर 'ही' भाजी ठरते रामबाण उपाय
भेंडी... ही अशीच एक भाजी. म्हणजे नुसतं नाव घेतलं तरीही अनेकांच्याच चेहऱ्याचा रंग बदलतो.
काहीजण औपचारिकता म्हणून ही ताटात असणारी भेंडीची भाजी मूक गिळून खातात. पण, तिचे फायदे तुम्हाला माहितीयेत का?
मधुमेह अर्थात डायबिटीज आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी भेंडीची भाजी म्हणजे एक वरदान. त्यामुळं इथून पुढे ही भाजी ताटात आली तर, ती तितक्याच चवीनं खा.
100 ग्रॅम भेंडीमध्ये 35 कॅलरी, 1.3 ग्रॅम प्रोटीन्स आणि 0.2 ग्रॅम फॅट असतात. विटामिन बी आणि फॉलेट अशी तत्वंही या भेंडीमध्ये असतात.
भेंडीमध्ये अनेक रोगप्रतीकारक तत्त्वं असून, विघटनशील आणि अविघटनशील तंतुंचा योग्य समतोल या भाजीमध्ये साधल्याचं पाहायला मिळतं. ज्यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं.
भेंडी ही एक अशी भाजी आहे, जिच्या सेवनामुळं त्यातून रक्तात मिसळल्या जाणाऱ्या साखरेचं प्रमाण कमी असतं. त्यामुळं मधुमेहींना त्याचा धोका उदभवत नाही.
मधुमेह असणाऱ्या रुग्णांना वारंवार जेवणात भेंडीचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. कारण, या भाजीमध्ये प्रचंड प्रमाणात प्रोटीन्स असतात. शिवाय कॅलरींचं प्रमाणही कमी असतं
भेंडीचं पाणी पिणं आरोग्यासाठी अतिशय फायद्याचं. यासाठी एका पातेल्यात चिरलेली भेंडी आणि पाण्याचं मिश्रण रात्रभर ठेवून सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यावं.
भेंडीची भाजी विविध पद्धतींनी बनवून खा किंवा पाण्यात मिसळून ते प्या. थोडक्यात कोणत्याही रुपात का असेना भेंडीची ही पोषक तत्त्वं तुमच्या शरीरात जाणं महत्त्वाचं.