Best Fruits For Constipation

'ही' 8 फळे बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय

मूळव्याध किंवा फिशरची समस्या

बद्धकोष्ठतावर वेळेवर उपचार न केल्यास मूळव्याध किंवा फिशरची समस्या तुम्हाला होऊ शकते.

रामबाण उपाय

बद्धकोष्ठतावर घरच्या घरी उपचार म्हणून या 8 फळांचं सेवन करा. त्यामुळे तुमच्या आतड्यांमधून अडकलेला मल बाहेर काढण्यास मदत होईल.

केळी

फायबर-समृद्ध केळीचा उपयोग बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. पिकलेली केळी खाल्ल्याने बाउल सिंड्रोम सुधारतो. शिवाय लहान आतड्यात असलेल्या मायक्रोव्हिलीला योग्य प्रकारे कार्य करण्यास मदत होते.

संत्री

संत्री फायबर आणि व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. बद्धकोष्ठतेमध्ये संत्री खावीत कारण त्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं.

किवी

किवी हे व्हिटॅमिन सी समृद्ध फळ आहे. त्यामुळेच बद्धकोष्ठतेसाठी सर्वोत्तम फळ आहे. याशिवाय त्यात भरपूर फायबर आणि पाणी असते. जे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं.

नाशपाती

नाशपातीमध्ये फायबरचसोबत फ्रक्टोज आणि सॉर्बिटॉल सारखे घटक देखील असतात. पोटाच्या समस्यांसाठी हे एक उत्तम फळ आहे. सॉर्बिटॉल मल मऊ करण्याचे कार्य करतं.

सफरचंद

सफरचंदपासून बद्धकोष्ठता तसंच अतिसारापासून आराम मिळतो. सफरचंद सालासह खाण्याचा सल्ला दिला जातो. सालीमध्ये अघुलनशील फायबर असते आणि त्यामुळे आतड्याची हालचाल होण्यास मदत होते.

पपई

पपई हे फायबर युक्त आणि कमी उष्मांक असलेले फळ आहे. त्यात पाण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे आतड्याची हालचाल वाढते.

अंजीर आणि सुका मनुका

अंजीर आणि सुका मनुका ही फळे देखील बद्धकोष्ठतेमध्ये आराम देतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story