निरोगी जीवन जगण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात राहणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या बदलत्या हवामानामुळे आणि जीवनशैलीमुळे प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रासला आहे.
डेंग्यू आणि मलेरिया हे डासांमुळे पसरणारे साथीचे रोग आहेत. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. डेंग्यूचा व्हायरस एडीस ईजिप्टाय डासांमार्फत एका माणसाच्या शरीरातून दुसऱ्यात जातो.
रुग्णाच्या रक्तातील प्लेटिलेट्सचं प्रमाण झपाट्याने कमी व्हायला लागतं आणि वेळीच उपचार मिळाले नाहीत, तर यात रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. डेंग्यूच्या रुग्णांसाठी पारिजाताचे झाड हे संजीवनी आहे.
प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीसाठी औषध घेतल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती नष्ट होते. अशा परिस्थितीत पारिजातच्या पानांचे सेवन केल्यास अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतील.
पारिजातचे पान औषधापेक्षा कमी नाही. याचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक मोठे आजार होणार नाहीत. डेंग्यू, ताप, मलेरिया, सांधेदुखी इत्यादी गोष्टींपासून तुमचे रक्षण होऊ शकते.
पारिजात वनस्पतीचे झाड आणि त्याची फुले अतिशय सुवासिक असतात. ज्या घरात हे झाड आहे, त्या घराच्या सभोवतालचे वातावरणही सुगंधित करते. हे पारिजात जंतुनाशक म्हणूनही गुणकारी मानले जाते.