अरबमधील 'या' देशात आजही दारु बेकायदेशीर; दारु प्यायल्यास होईल 'ही' कारवाई

Jan 26,2024

पार्टीमध्ये किंवा विकेंडला अनेक जण दारु पितात. मात्र सौदी अरेबियामध्ये चक्क दारु पिणे बेकायदेशीर मानले जाते. या देशात बऱ्याच वर्षापासून दारुबंदी केली जाते.

असे म्हटले जाते की, बऱ्याच वर्षांपूर्वी एका शाही पार्टीमध्ये सौदी अरेबियाचा राजा अब्दुल अजीजने परदेशी पाहुण्यांना बोलावले होते.

त्यावेळी राजा अब्दुल अजीजच्या मुलाने खुप दारू प्यायली होती.

त्यावेळी त्याला राजा अब्दुल अजीजने दारू त्याच्या मुलाला दारु पिण्यास नकार दिला.

तेव्हा राजा अब्दुल अजीजच्या मुलाचा पारा चढला आणि रागाच्या भरात त्याने एका इंग्रज पाहुण्यावर गोळी चालवली. त्यामुळे हत्येच्या आरोपाखाली अब्दुल अजीजच्या मुलाचा जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.

तेव्हापासून सौदी अरेबियामध्ये दारुवर बंदी आणण्यात आली.

सौदी अरेबियामध्ये दारु पिणे बेकायदेशीर असून जर कोणी असे केले तर दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येते.

याशिवाय परदेशी नागरीकांनी सौदी अरेबियामध्ये दारु पिण्यास सक्त मनाई केली जाते.

VIEW ALL

Read Next Story