जास्वंदाच्या फुलांचा वापर आपण नेहमी देवघरात किंवा घराच्या सजावटीसाठी करतो.
परंतु 'Hibiscus' म्हणजे जास्वंदाची पाने सुकवून त्यापासून जास्वंदाचा चहा तयार करण्यात येतो.हे तुम्हाला माहितीए का?
या फुलांमध्ये असणारे प्राकृतिक गुणधर्म उच्च रक्तदाब तसेच पोटाच्या विकारांशी लढण्यास मदत करतात.
जास्वंदाच्या पानांच्या चहाची चव थोडी तिखट आणि गोड लागते.
शिवाय या हर्बल टी च्या सेवनाने शरीरातील मधुमेह नियंत्रणात राहतो
तसेच उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठीही या चहाचे सेवन उपयोगी ठरेल.
याशिवाय यामधील गुण हे कॅन्सरशी लढण्यासही मदत करतात.
वजन नियंत्रणात आणायचे असल्यास किंवा पोटावरील चरबी कमी करण्यासाठी जास्वंदाचा चहा पिणे अत्यंत उपयुक्त ठरते.
जास्वंदीच्या चहामध्ये एमिलेज एक्झांइम असते जे शरीरातील स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखण्याचं काम करते.