लाल रंगांच्या फळांमध्ये लोह, फायबर, ऍंटीऑक्सिडेंट्स, पोटॅशिअम आणि लायकोपीनसारखे बरेच पोषक तत्वं असतात.
लाल रंगाच्या फळांमध्ये असणारी ही पोषक तत्त्वं आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरतात.
रक्ताची कमतरता असलेल्यांना शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यासाठी लाल रंगाची फळं खाण्याचा सल्ला दिला जातो.
ही फळं कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीजचा धोका कमी करतात. सुदृढ शरीरासाठी डाळिंब खाणं योग्य ठरेल.
सफरचंदामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. तर, कलिंगड शरीरात पाण्याचे प्रमाण मर्यादीत ठेवण्यास मदत करतं.
टोमॅटो शरीराला ऍंटीऑक्सिडेंट्स, फायबर आणि विटॅमिन ए आणि सीचा उत्तम स्त्रोत आहे.