चिल्ड बीयर अधिक चांगली का लागते? वैज्ञानिकांनी शोधलं खरं कारण

चिल्ड बीयर

अनेकांना चिल्ड बीयर प्यायला आवडते. चिल्ड नसेल तर प्यायला मजा नाही राव, असं अनेकांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल.

वैज्ञानिक कारण

पण लोकांना चिल्ड बीयर का आवडते? त्याचं वैज्ञानिक कारण आता समोर आलं आहे. मॅटर जर्नलमध्ये यावर माहिती देण्यात आली आहे.

इथेनॉलचे रेणू

प्रकाशित झालेल्या एका संशोधनात थंड बिअरची चवीविषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये बीयरमधील इथेनॉलचे रेणू परिणामकारक असतात, असं सांगण्यात आलंय.

प्रोफेसर ली जियांग

इथेनॉलच्या रेणूंची चव पाण्याच्या तापमानानुसार बदलते, असं संशोधनात सांगण्यात आलंय. प्रोफेसर ली जियांग यांनी यावर अधिक माहिती दिली.

अनोखी वैशिष्ट्ये

आमच्या संशोधनाच्या परिणामांमुळे चिल्ड बिअर जास्त आवडते. कमी तापमानामुळे बिअरची अनोखी वैशिष्ट्ये वाढतात, असं ली म्हणतात.

चिल्ड बिअरची चव

ज्यावेळी पाण्याचं तापमान कमी होते त्यावेळी इथेनॉलचे रेणू एकमेकांच्या जवळ येतात, ज्यामुळे चिल्ड बिअरची चव चांगली होते.

हवामान बदल

येत्या काळात हवामान बदलामुळे बीयरच्या किमती आणि त्याची चव देखील बदलताना दिसेल, असंही या संशोधनात सांगण्यात आलं आहे.

Disclaimer

(इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

VIEW ALL

Read Next Story