थंडीत प्रतिकारशक्ती कमी झाल्याने अनेक व्हायरल संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे शरिराला पोषणतत्वं देण्याची गरज असते.

थंडीतील आजारांविरोधात लढा

सर्दी, खोकला, ताप असे अनेक आजार थंडीत बळावतात. अशात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला ताकद देण्यासाठी मनुक्याचं सेवन करा.

मनुक्यात अनेक पोषणतत्वं

मनुक्यात अँक्टी-बॅक्टेरिअरल गुण, कॅल्शिअम, पोटॅशिअम यासह अनेक पोषणतत्वं असतात. मनुक्यात आयर्न आणि फायबर असल्याने पचनक्रीया सुधारते आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो.

मनुक्यात कॅल्शिअम असतं जे हाडं आणि दातांना मजबूत बनवतात.

मनुका शहरातील टॉक्सिंसला बाहेर काढतं, ज्यामुळे त्वचा स्वच्छ होते. तसंच तोंड येणं आणि कोरड्या त्वचेपासून सुटका होते.

रोज 8 ते 10 मनुके खाल्ल्याने शरिरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते. यामध्ये असणारं आयर्न एनिमियाला दूर करतं आणि शरिरातील रक्त वाढवतं.

मनुक्यात फायबर असतं जे वजनावर नियंत्रण आणतं.

रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात 5 ते 7 मनुके उकळून प्यायल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. सकाळी पाण्यासह प्यायल्यास पचनतंत्र सुधारतं.

रात्री मनुके आणि दुधाचं सेवन केल्यास चांगली झोप लागते.

यामध्ये देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपचार, डाएट, दवा यांचा अवलंब करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

VIEW ALL

Read Next Story