पोटाचा घेर कमी करणं म्हणजेच बेली फॅट कमी करणं हे कठीण काम मानलं जातं.
बेली फॅट कमी करण्यासाठी जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही झोपण्याच्या अवस्थेत देखील बेली फॅट कमी करू शकता.
झोपून तुम्ही बेली फॅट कमी करण्यासाठी कोणत्या एक्सरसाईज करू शकता, हे जाणून घेऊया.
लेग रेजने तुमच्या पायांची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी केली जातो. मात्र या व्यायामाचा परिणाम तुमच्या पोटाच्या चरबीवर देखील होतो.
विंडशील्ड वायपर ही एक्सरसाईज केल्याने पायाची आणि जांघेची चरबी कमी होते. याशिवाय पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील हा व्यायाम उपयुक्त ठरू शकतो.
क्रंचेसच्या सहाय्याने तुमचं बेली फॅट अधिक वेगाने कमी होण्यास मदत होते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)