पनीरमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन डी आणि फॉस्फरससारखी पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
मात्र काहींसाठी पनीर खूप धोकादायक ठरू शकते. तर पाहुयात कोणी पनीर खाणे टाळावे.
डायरियाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी पनीरचे सेवन टाळावे, अन्यथा समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी पनीर खाणे मर्यादित ठेवावे.
बद्धकोष्ठता, आम्लपित्त किंवा पोटात गॅस सतत होत असल्यास पनीर खाणे टाळावे.
ज्या लोकांची कॉलेस्ट्रॉलची पातळी जास्त आहे त्यांनी पनीर खाणे पूर्णपणे टाळावे.
हृदयविकार असलेल्या रुग्णांनी पनीर खाऊ नये, कारण त्यातील फॅट्स रक्तदाब व कॉलेस्ट्रॉल वाढवू शकतात.
दुधाच्या पदार्थांमुळे त्रास होणाऱ्या व्यक्तींनी पनीर खाणे टाळावे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)