हल्ली PCOS हा शब्द खूपदा कानावर पडू लागला आहे. ही समस्या आजकाल प्रत्येक महिला आणि मुलींमध्ये अगदी सामान्य झाली आहे. त्यांना किती वेदना आणि त्रास सहन करावा लागतो याची कल्पना करणे कठीण आहे.
ही समस्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे उद्भवते. PCOS मध्ये, महिलांच्या अंडाशयात लहान गाठी तयार होतात. या गाठ्यांमुळे अंडाशय नीट कार्य करू शकत नाहीत. अनियमित मासिक पाळी येणे, वेदना, चेहऱ्यावर जास्त केस येणे, अॅक्ने, ब्रेकआउट, आणि इनफर्टिलिटी अशा समस्या अधिक होतात.
PCOS च्या उपचारांसाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. जर एखाद्या महिलेला अशा प्रकारचा त्रास होत असेल तर तिने नेहमी या गोष्टींचं सेवन करणे टाळावे.
केक, पेस्ट्री, व्हाईट ब्रेड, पास्ता इत्यादी भरपूर मैदा वापरणाऱ्या खाद्यपदार्थांपासून दूर राहा. यामुळे PCOD आणि PCOS मध्ये आणखी समस्या निर्माण होऊ शकतात.
फास्ट फूड, मैदा, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राय इत्यादींपासून नेहमी दूर राहा आणि PCOD आणि PCOS च्या समस्येच्या वेळी ते अजिबात खाऊ नका. यामुळे तुमची समस्या वाढू शकते.
जास्त साखर असलेल्या आणि कार्बोनेटेड अशा एनर्जी ड्रिंक्सपासून दूर राहिले पाहिजे. यामध्ये कोल्ड्रिंक्स, सोडा, बिअर इ. त्यांच्यातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने ते खूप हानिकारक ठरू शकतात.
जर आपण पीसीओएस आणि पीसीओडीच्या समस्येबद्दल बोललो तर प्रोसेस्ड मीट खाणे टाळा. यामुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब वाढू शकतो. या मांसाचे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात. सलामी, सॉसेज, हॉट डॉग्स, हॅम, बेकन इत्यादी सर्व काही टाळावे.
बेरी, हिरव्या पालेभाज्या, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करावा. आपण आपल्या आहारात डार्क फ्रूट्स आणि हेल्दी फॅट्स समाविष्ट करू शकता. ऑलिव्ह ऑईल, एवोकॅडो, नारळ, नट्स इत्यादी सर्व काही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.