कांदा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी कांदा वापरला जातो.
यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते
कांदा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते तर मधुमेह असलेल्या लोकांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
कच्चा कांदा कॅन्सरशी लढण्यासाठी गुणकारी आहे. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते जे कर्करोगाच्या पेशी वाढू देत नाही तसेच कर्करोगाशी लढण्याची क्षमता देते.
कांद्यामध्ये औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने उष्माघाताची समस्याही बऱ्याच अंशी कमी होते.(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)