शरद पवारांचा स्ट्राइक रेट 80%... 10 पैकी नेमक्या कोणत्या 2 जागांवर उमेदवार पडले?

सर्वात मोठा स्ट्राइक रेट

शरद पवार गटाने लढलेल्या 10 जागांपैकी 8 जागा जिंकत मराहाष्ट्रातील सर्व पक्षांमध्ये विजयाचा सर्वाधिक स्ट्राइकर रेट राखला. मात्र कोणत्या दोन जागांवर त्यांचा पराभव झाला हे पाहूयात...

शिरुरमध्ये पुन्हा अमोल कोल्हेच

शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी अजितदादा गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.

माढ्यात वाजली तुतारी

माढ्यामध्ये शरद पवार गटाचे धैर्यशील मोहित पाटील जिंकले त्यांनी भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना पराभूत केलं.

केंद्रीय मंत्र्याला धूळ चारली

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंनी भाजपच्या केंद्रीय मंत्री भारती पवार यांना पराभूत केलं.

बारामतीचा गड राखला

बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे जिंकल्या असून अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार पराभूत झाले.

अमर काळेही जिंकले

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अमर काळेंनी भाजपच्या रामदास तडस यांना धूळ चारली.

भिवंडीत केंद्रीय मंत्र्याला पाडलं

भिवंडीमध्ये शरद पवारांच्या सुरेश म्हात्रे म्हणजेच स्थानिकांमध्ये बाळ्या मामा नावाने लोकप्रिय असलेल्या उमेदवाराने विजय मिळवला. त्यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पराभूत केलं.

सोनावणे ठरले जायंट किलर

बजरंग सोनावणेंनी बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडेंचा पराभव केला आहे. हा भाजपा आणि पंकजांसाठी मोठा धक्का ठरला.

लंकेंनी घराणेशाहीला दिला धक्का

अहमदनगरमध्ये निलेश लंकेंनी भाजपाच्या सुजय विखे पाटील यांना धूळ चारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

शरद पवारांचा पहिला पराभूत उमेदवार कोण?

शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांमध्ये उदयनराजे भोसलेंविरुद्ध लढलेल्या शशिकांत शिंदेंचा समावेश आहे. उदयनराजेंना 5,71,134 मतं मिळाली. तर पराभूत शिंदेंना 5,38,363 मतं मिळाली.

पराभूत झालेला दुसरा उमेदवार कोणता?

रावेर मतदारसंघातून भाजपाच्या रक्षा खडसेंनी बाजी मारली. या ठिकाणी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील पराभूत झाले. रक्षा खडसेंना 6,30,879 मतं मिळाली तर पाटील यांना 3,58,696 मतं मिळाली.

VIEW ALL

Read Next Story