उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतुमध्ये आपण पाणी प्यायलं पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवल्या पाहिजेत.
त्या बाटल्यांमध्ये किती बॅक्टेरिया असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? बाटल्यांमध्ये आर्द्रता असल्याने त्यामध्ये सूक्ष्मजीव आढळतात.
या बाटलीतील पाणी प्यायल्यास अनेक आजार होतात. हे टाळण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या बाटल्या वेळोवेळी स्वच्छ केल्या पाहिजेत.
प्रश्न असा आहे की, किती दिवसांनी आपण आपली बाटली साफ केली पाहिजे?
तर आपण आपली बाटली दररोज साबणाच्या साहाय्याने स्वच्छ केली पाहिजे.
त्यामुळे बाटल्या स्वच्छ राहतात आणि त्यांच्या बॅक्टेरिया कमी वाढतात. बाटल्या स्वच्छ करण्यासाठी फक्त गरम पाणी वापरावे.