रताळे भारतात सहज उपलब्ध आहेत कारण दुष्काळातही त्याचं पीक सहजगत्या घेता येतं. आश्चर्याची बाब म्हणजे हे रताळं भारतात कमी किंमतीला विकलं जातं.
हेच स्वस्तात मिळणारे रताळे तुमच्या आरोग्यासाठी कमालीचं गुणकारी आहे. हे माहितीये का?
विविध अहवालांतून असे आढळून आले आहे की रताळ्यामध्ये अँथोसायनिन्स असतात, जे सूक्ष्म स्तरावर पेशींना निरोगी ठेवतात.
रताळी रोगप्रतिकारक घटकांनी समृद्ध असतात जे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून पेशींचे संरक्षण करतात.
विषारी पदार्थ, मुक्त रॅडिकल्स आणि शरीरातील जळजळ रताळ्यांच्या सेवनामुळे कमी होते. ज्यामुळे हृदयविकार आणि कर्करोगाला दूर ठेवता येतं.
रताळ्यांचं नियमित सेवन केल्यास ते मधुमेह कमी करतात. कमी वयापासून त्यांचे सेवन केल्यास स्वादुपिंड सुरक्षित राहतं.
रताळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे तसेच काही ब जीवनसत्त्वे, सी आणि ई सारखे घटक असतात.
हृदयासाठी, रताळ्यामध्ये केळीपेक्षा जास्त पोटॅशियम असते आणि शरीरातील अनेक कार्यांमध्ये मदत करतात.
इतकेच नाही तर, रताळ्यातील उच्च फायबर सामग्री कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राखण्यासही मदत होते.