गायकाचे वजन पुन्हा वाढले

लिफ्ट करा दे म्हणत सर्वांना आपल्या गाण्यावर नाचायला लावणारा गायक अदनान सामी त्याच्या वाढलेल्या वजनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कॅमेरात कैद झाला अदनान सामी

बुधवारी अदनान सामी मुंबईत स्पॉट झाला. त्यावेळी पापाराझींनी त्याला पाहताच त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली.

वाढत्या वजनामुळे सामी पुन्हा चर्चेत

अदनान सामीचे फोटो समोर आल्यानंतर पुन्हा एकदा त्याचे वजन वाढल्याचे समोर आलं आहे. एक काळ असा होता जेव्हा त्याचे वजन 250 किलो होते.

तब्बल 130 किलो वजन कमी केले

काही वर्षांपूर्वी अदनान सामीने त्याच्या फिटनेसवर काम सुरू केले आणि 130 किलो वजन कमी केले.

ओळखणं झालं होतं कठीण

हळूहळू त्याने आपलं वजन कमी केले. मात्र वजन कमी केल्यानंतर तो जगासमोर आला तेव्हा त्याला ओळखणे कठीण झाले होते.

डॉक्टरांनी दिली सहा महिन्यांचा वेळ

आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी बोलताना त्याने सांगितले होते की, डॉक्टरांनी त्याला जीवनशैली बदलण्यासाठी 6 महिन्यांचा वेळ दिला होता.

वडिलांनी दिला वजन कमी करण्याचा सल्ला

जर वजन कमी झाले नाही तर त्याचा मृत्यूही होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले होती. ही बाब त्याच्या वडिलांना कळताच त्यांनी वजन कमी करण्यास सांगितले.

सहा महिने घेतली होती मेहनत

6 महिने, अदनानने पूर्ण समर्पणाने त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आणि जगाला दाखवून दिले की काहीही अशक्य नाही.

अदनान सामीचे चाहते चिंतेत

मात्र 6 महिन्यांच्या मेहनतीनंतर 130 किलो वजन कमी केलेल्या अदनानचे वाढलेले वजन पाहून आता चाहते अस्वस्थ आहेत.

VIEW ALL

Read Next Story