असंतुलित आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे कोलेस्ट्रॉल शिरांमध्ये जमा होते. अशा परिस्थितीत जमा झालेले कोलेस्ट्रॉल साफ करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींच सेवन करणं टाळायला हवं. अशावेळी संतुलित आहार घेणं गरजेचं असतं.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते शिरांमध्ये जमा होणारे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी तुम्ही नट्स, बीन्स आणि ओट्सचं सेवन करू शकता. यामध्ये असलेले पोषक घटक शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात
नसांमध्ये जमा होणारा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सोयाबीनचं सेवन करणं फायदेशीर ठरते.
काजू कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतं. त्याचबरोबर तुम्ही बदाम,शेंगदाणे आणि अक्रोडचे सेवन करू शकता.
बीन्स कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. त्याशिवाय वजन देखील नियंत्रणात राहते.
ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.
सूर्यफूल, कॅनोला आणि करडई यांसारखे स्वयंपाकघरात वापरले जाणार तेल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर हृदयाचे आरोग्य देखील चांगल ठेवतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)