दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा झाला.
या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार सहभागी झाले होते.
या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिने व नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली.
यंदाच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात भरत जाधव आणि किशोरी शहाणे हे एक आगळावेगळा परफॉर्मन्स सादर करणार आहेत.
या परफॉर्मन्समधून लक्ष्मीकांत बेर्डेंच्या कारकिर्दीचा सुवर्ण काळ दाखवला जाणार आहे.
याचे काही फोटोही झी मराठीने पोस्ट केले आहेत. यात भरत जाधव हे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वेशभूषेत दिसत आहेत.
यावेळी त्यांच्या निवडक भूमिका आणि गाण्यांवर परफॉर्म करत त्यांना मानवंदना दिली गेली.
हे फोटो पाहिल्यानंतर प्रेक्षकही त्यांचा हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहेत.