बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ऋषी कपूर यांचे स्वेटरप्रेम जगजाहीर आहे. बॉलिवूडचा 'स्वेटरबॉय' म्हणून ऋषीजींना ओळखले जायचे.


एक काळ तर असाही होता की त्यांचा हा शौक एक स्टाइल स्टेटमेंट बनला होता.


त्या काळी ऋषीजींची फॅन फॉलोइंग इतकी प्रचंड होती की 80 च्या दशकात तरुणांनी त्यांची ही स्टाइल फॉलो करायला सुरुवात केली.


एवढंच नाही तर दुकानांमध्ये खास ऋषी कपूर स्वेटर आणि जॅकेटची मागणी वाढली होती.


त्यांनी त्यांच्या जवळजवळ सर्वच सिनेमांमध्ये स्वेटर घातलेले दिसून येते. त्यांचे स्वेटरप्रेम इतके होते की सिनेमामध्ये एकदा घातलेला स्वेटर त्यांनी पुन्हा कधीच दुसऱ्या सिनेमात घातला नाही.


'बॉबी' सिनेमातील 'हम तुम एक कमरे में बंद है' गाण्यात ऋषीजींनी काळ्या स्वेटरवर गुलाबी रंगाचा पट्टेरी मफलर घातलेला लुक फारच गाजला होता.


त्यानंतर श्रीदेवी सोबतचा 'चाँदनी' सिनेमा असो किंवा दिव्या भारती सोबत केलेला 'दिवाना'; ऋषीजींनी घातलेले स्वेटर तेव्हाही प्रसिद्ध झाले होते.


पण 80's च्या शेवटी जेव्हा हा ट्रेंड काही अंशी कमी झाला तेव्हा बऱ्याच जणांनी हा प्रश्न उपस्थित केलेला की, आता ट्रेंड नसतानाही तुम्ही स्वेटर का घालता?


यावर असे म्हंटले गेले की ऋषिजी पोट वाढल्यामुळे ते लपवण्यासाठी अजूनही स्वेटरच घालतात. (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

VIEW ALL

Read Next Story