बॉलिवूड मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान याने आपल्या विलक्षण अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
आमिरने अनेक हिट चित्रपट केले अन् अनेक अवॉर्ड देखील जिंकले. मात्र, आमिर कधीही अवॉर्ड शोला हजेरी लावत नाही.
आमिर खान अवॉर्ड शोमध्ये का जात नाही? असा सवाल जेव्हा आमिरला विचारला तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिलं.
द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमात आमिर खानने हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने असं काही उत्तर दिलं की आख्खं पब्लिक हसायला लागलं.
मला वाटतं की, आयुष्यात सर्वात महत्त्वाचं काय असतं? तर ती वेळ...! आणि मला वाटतं की या वेळाचा योग्य वापर केला पाहिजे, असं आमिर म्हणतो.
उत्तर देताना आमिरला हसू आवरलं नाही. त्यावेळी कपिल शर्मा देखील खदाखदा हसला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
1995 साली जेव्हा शाहरुख खानच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे' या सिनेमाला भरपूर अवॉर्ड मिळाले अन् आमिरच्या रंगिलाला अवॉर्ड मिळाले नाही.
आपल्या उत्तम सिनेमाला अवॉर्ड न मिळाल्याने आमिर नाराज झाला होता. तेव्हापासून त्याने अवॉर्डला न जाण्याचा निर्णय घेतला होता, असं सांगितलं जातं.