जया बच्चन या कायमच त्यांच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत असतात.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होण्याचं कारण आहे ते म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेकचं नातं.
सध्या सोशल मीडियावर जया बच्चन यांचा एक व्हिडीओ प्रंचड व्हायरल होत आहे. जिथं त्या आपण पालक म्हणून अतिशय शिस्तप्रिय असल्याचं म्हणताना दिसत आहेत.
तुम्ही सुनबाई ऐश्वर्यासाठीही तितक्याच शिस्तप्रिय पालक आहात का? असा प्रश्न विचारला जाताच जया बच्चन म्हणाल्या...
ऐश्वर्या माझी मुलगी नाही, सून आहे. मी तिच्यासाठी दरडावणारी पालक का होऊ, त्यासाठी तिची आई आहेच.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये जया बच्चन पालक आणि सासू सासरे यांच्यातील फरक समजवताना दिसत आहेत.