कुटुंबासोबत पाहू शकता अशा '6 'वेब सिरीज

धावपळीच्या जीवनात कुटुंबासोबत वेळ घालवणं आपण विसरूनच गेलो आहोत. अशावेळी कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे एक चांगले निमित्त म्हणजे मनोरंजनात्मक चित्रपट आणि वेब सिरीज. तुम्हीसुद्धा तुमच्या कुटुंबासोबत पाहू शकता अशा 6 वेब सिरीज.

गुल्लक

या वेब सिरीजमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबाचे दैनंदिन जीवन दाखवण्यात आले आहे.या कुटुंबातील भांडणे आणि विनोद प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतात. ही वेब सिरीज तुम्ही SonyLiv वर पाहू शकता.IMDb वर या सिरीजचं रेटिंग 10 पैंकी 9.1 आहे.

पंचायत

ही वेब सिरीजमध्ये एका MBA इच्छूक व्यक्तीची आहे. तो व्यक्ती नोकरी न मिळाल्याने एका छोट्या गावातील पंचायत कार्यालयाल कामाला लागतो. या वेब सिरीजमध्ये प्रत्येक पैलू विनोदाने आणि गंभीर पद्धतीने दाखवण्यात आले आहे. ही वेब सिरीज तुम्ही Amazon Prime वर पाहू शकता.IMDb वर या सिरीजचं रेटिंग 9 आहे.

ये मेरी फैमिली

90च्या दशकातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या कुटुंबाची कथा या वेब सिरीजमध्ये दर्शवली आहे.ही वेब सिरीज Amazon Prime वर उपलब्ध असून IMDb वर या सिरीजचं रेटिंग 9 आहे.

चाचा विधायक है हमारे

या वेब सिरीजमध्ये एका तरूणाची कथा आहे ज्याचा काका राजकारणात असल्याने त्याच्या उच्च प्रभावाचा फायदा मिळतो. यामध्ये राजकारणासोबतच कौटुंबिक संबंधही चांगले दाखवले आहेत.या मालिकेचे पहिले 2 भाग Amazon Prime वर आणि तिसरा भाग Amazon miniTV वर मोफत पाहता येईल.

दी आम आदमी फैमिली

ही एक कॉमेडी ड्रामा वेब सिरीज आहे ज्यामध्ये सामान्य कुटुंबाच्या जीवनीतील विनोदी घटना दाखवली आहे.ही वेब सिरीज Zee5 वर उपलब्ध आहे.

होम

या वेब सिरीजमध्ये एक मध्यमवर्गीय कुटुंब आपलं घर वाचवण्यासाठी मेहनत करताना दाखवले आहे. या सिराजमध्ये कुटुंबातील सदस्यांचे घट्ट नातेसंबंध दाखवले आहे. ही वेब सिरीज तुम्ही Jio Cinema वर मोफतमध्ये पाहू शकता.

VIEW ALL

Read Next Story