उर्वशी रौतेलाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बर्थडे सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्रीने तिच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त 24 कॅरेट सोन्याचा केक कापून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.

यावर्षी उर्वशीने तिचा खास मित्र यो यो हनी सिंगसोबत वाढदिवस साजरा केला आहे. फोटोंमध्ये हनी सिंग उर्वशीला प्रेमाने केक भरवताना दिसत आहे.

यावेळी अभिनेत्रीने लाल रंगाचा ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

सध्या उर्वर्शी तिच्या आगळ्या वेगळ्या बर्थडे सेलिब्रेशनमुळे चर्चेत आली आहे.

VIEW ALL

Read Next Story