बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे एका चित्रपटात कामाचे कोट्यावधी रुपये मानधन आकारतात. पण हल्ली अनेक बॉलिवूड कलाकार हे यशस्वी उद्योजकही झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांपासून अनेक बॉलिवूड कलाकारांनी हॉटेल्स सुरु केले आहेत. त्याद्वारे दर महिन्याला ते लाखो रुपये कमावतात.

करण जोहर

प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचे मुंबईत एक अलिशान हॉटेल आहे. न्यूमा असे त्याच्या रेस्टॉरंटचं नाव आहे. यातून त्याला लाखो रुपये मिळतात.

शिल्पा शेट्टी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही यशस्वी उद्योजिका आहे. तिने मुंबईत बस्टिन नावाचे अलिशान रेस्टॉरंट सुरु केले आहे.

धर्मेंद्र

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी स्वत:चे रेस्टॉरंट सुरु केले आहे. याचे नाव 'गरम धरम ढाबा' असे आहे. या रेस्टॉरंटमध्ये धर्मेंद्र यांचे अनेक पोस्टरही पाहायला मिळतात.

गौरी खान

या यादीत शाहरुख खानची पत्नी गौरी खानचे नावही समाविष्ट आहे. काही दिवसांपूर्वीच गौरीने एक रेस्टॉरंट सुरु केले आहे. टोरी असे तिच्या रेस्टॉरंटचे नाव आहे.

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्राने अमेरिकेत भारतीय रेस्टॉरंट सुरु केलं आहे. तिच्या या रेस्टॉरंटचे नाव 'सोना' आहे.

प्रियांकाचे मित्र मनीष गोयल आणि डेव्हिड रॉबिन यांनी तिला हे रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मदत केली आहे. यात अनेक डोसा, भजी, मालवणी कोळंबी करी, बटर चिकन आणि नान असे अनेक प्रसिद्ध भारतीय पदार्थ चाखता येणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story