हा मराठमोळा कलाकार ठरला ‘सर्वोत्कृष्ट आयकॉनिक अभिनेता’

गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटानं फक्त बॉक्स ऑफिसवरचं धुरळा केला नाही तर, या चित्रपटातील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

संदिप रेड्डा वांगा दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी ही तगडी स्टार कास्ट होती.

या चित्रपटात फॅड्री पाटील ही भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्यानं भाव खाल्ला आहे.

उपेंद्र लिमयेने साकारलेल्या फॅड्री पाटील या पात्रानं सगळीकडे धुमाकूळ घातला.

अभिनेते उपेंद्र लिमये यांनी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाबद्दलची एक खास पोस्ट शेअर केली आहे.

उपेंद्र लिमयेंना तिरुपती येथे ‘सर्वोत्कृष्ट आयकॉनिक अभिनेता’ हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं आहे.

सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत उपेंद्र लिमयेंनी या पुरस्काताबद्दल सांगितलं आहे.

अ‍ॅनिमलच्या यशानंतर आता लवकरच उपेंद्र लिमये ‘मडगाव एक्स्प्रेस’ या नव्या बॉलीवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

VIEW ALL

Read Next Story