मानसिकदृष्ट्या आजारी सांगत घटस्फोटाची मागणी

एक दिवस आशिष आपल्या भावाला भेटण्याच्या बहाण्याने बाहेर गेला आणि परत आलाच नाही. त्याच्या आई-वडिलांनी माझ्यावरच आरोप केले. आता मला मानसिकदृष्ट्या आजारी सांगत घटस्फोट मागितला जात आहे असं काजोलचं म्हणणं आहे.

मानसिक छळ

मी आऊटडोअर शूटवरुन आल्यानंतर साखरपुडा करु इच्छित होती. कारण आमचं लग्न घाईत रजिस्ट्रार ऑफिसमध्ये झालं होतं. पण त्याने माझा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. तो मला मारत असे, कपडे फाडत असे असा तिचा आरोप आहे.

लग्नानंतर संबंध बिघडले

यानंतर आशिषच्या कुटुंबीयांनी समजूत काढत दोघांचं लग्न लावलं होतं. पण काही महिन्यातच दोघांच्या नात्यात कटुता निर्माण झाली.

पोलिसांकडे तक्रार

आशिषने आपल्याशी प्रेमसंबंध ठेवले, पण लग्न करण्याची वेळ तेव्हा पळ काढला असा काजलचा आरोप आहे. तिने याप्रकरणी पोलिसांकडे बलात्कार आणि लग्नाचं अमिष दाखवल्याची तक्रार केली होती.

जबरदस्ती गर्भपात

काजल आणि आशिष गेल्या अनेक काळापासून एकत्र होते. यादरम्यान आपण गरोदर होते असा काजलचा दावा आहे. आशिषने जबरदस्ती आपल्याला गर्भपात करायला लावला असा तिचा आरोप आहे.

अभिनेता आशिष भारद्वाजवर आऱोप

'मिठाई' फेम अभिनेता आशिष भारद्वाजची पत्नी काजल चोनकरने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. काजलदेखील एक टीव्ही अभिनेत्री आहे. स्टार प्लसवरील मालिका 'चिकू' आणि 'ये इश्क नचाए' मध्ये ती झळकली होती.

VIEW ALL

Read Next Story