आज आम्ही ज्या सिनेमाविषयी तुम्हाला सांगत आहोत तो सिनेमा दुसरा तिसरा नसून 'नागिन' आहे.

हा चित्रपट 16 जानेवारी 1976 रोजी प्रदर्शित झाला होता.

यासिनेमात भली मोठी स्टारकास्ट होती. सुनील दत्त, फिरोज खान, संजय खान, रेखा, मुमताज, जितेंद्र, रीना रॉय, कबीर बेदी, विनोद मेहरा, अनिल धवन, नीलम मेहरा आणि योगिता बाली यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाने कलेक्शनच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले.

या चित्रपटात अनेक अभिनेत्री होत्या पण रीना रॉयच्या अभिनयाचे विशेष कौतुक झालं.

या चित्रपटाने तिचं नशीब चमकवले. या चित्रपटामुळे रीना रॉय रातोरात स्टार बनली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट बनवण्यासाठी अंदाजे 1 कोटी 40 लाख रुपये खर्च आला. मात्र या सिनेमाने त्याकाळी 7 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं.

VIEW ALL

Read Next Story