अभिनेता गुलशन देवैया हा 45 वर्षांचा असून त्यानं पत्नी कल्लिरोई तजियाफेटाला घटस्फोट दिला होता.
गुलशन देवैयाला ही घटस्फोटानंतर तो दुसऱ्या साथिदाराच्या शोधात होता. मात्र, त्याला ही गोष्ट जाणवली की त्याला कल्लिरोईपेक्षा चांगली साथीदार मिळू शकत नाही.
गुलशनला त्याची चूक लक्षात येताच त्यानं पूर्वाश्रमीची पत्नी कल्लिरोई तजियाफेटाकडे पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला.
कल्लिरोई आणि गुलशन यांना त्यांच्या घटस्फोटानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नात्यात प्रेम दिसू लागलं आहे. याविषयी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं आहे.
गुलशन त्याच्या नात्याबद्दल म्हणाला, आमचं एकमेकांवर प्रेम अजूनही आहे. अनेक कारणांमुळे आम्ही आमच्या नात्याला योग्य न्याय देऊ शकलो नाही. मात्र, आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही.
आम्ही दोघेही पूर्वीपेक्षा अधिक प्रगल्भ झालो आहोत. आता माझ्याकडे पूर्वीपेक्षा जास्त संयम आहे. गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि हाताळणे यावर मी काम सुरु केलं आहे. आता आमच्यात सगळं सुरळीत सुरु आहे
गुलशन देवैया म्हणाले की 'आधीपेक्षा आता खूप चांगली परिस्थिती आहे. महत्त्वाचं म्हणजे आम्ही आता जास्त विचार करत नाही. रेस्टॉरंटमध्ये जातो, फिरण्याचे प्लॅन करतो.'
कामाला खासगी आयुष्यापासून वेगळं केलं आहे. सकाळी 9 च्या आधी आणि संध्याकाळी 7 नंतर तो कामा संबंधित बोलत नाही. रविवारी सुट्टी घेतो आणि घरीच राहतो. त्याचे आई-वडिल नोकरी करायचे त्यांच्याप्रमाणे त्यानं आता वेळापत्रक बनवलंय. (All Photo Credit : Gulshan Devaiah Instagram)