वजन कमी करायचं? 'या' सोप्या रेसीपीला ट्राय करा

वजन कमी करण्यासाठी अनेक जण विविध उपाय ट्राय करतात पण तरी देखील पोट कमी होत नाही. वजन वाढले की पोटावरील चरबी देखील वाढते. या वाढत्या वजनाला नियंत्रीत ठेवायचं असेल त्र डायट महत्त्वाच आहे.

मखनियामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे पचन मंद होण्यास मदत करतात. हे आपले चयापचय नियंत्रित करून वजन नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे रोज नाश्त्यात मखना खाल्ल्याने वजन कमी होते, तृप्तता येते आणि आपल्याला बरे वाटते. चला तर बघूया मखाना चाट कसे बनवायचे.

सामग्री :

मखाने, टोमॅटो, उकडलेले बटाटे, सेंधा मिठ लाल मिर्ची पाउडर, कोथिंबीर, शेंदाणा, हिरवी मिर्ची, लिंबू, शेव, तूप

सर्वप्रथम गॅसववर एक भांड ठेवा. त्यामध्ये तूप चांगलं तापून द्या. तूप तापल्यानंतर त्यामध्ये मखाने टाका.

गरम तूपात मखान्यांना कुरकुरीत खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. भाजल्यानंतर मखाने ठंड करायला ठेवा.

त्यानंतर एका वाटीमध्ये भाजलेले मखाने काढुन घ्या त्यामध्ये उकडलेला बटाटा, टोमॅटो, हिरवी मिर्ची आणि शेंदाणा घालून मिक्स करा.

या मिश्रणात मिठ, लिंबाचा रस आणि लाल मिर्ची पावडर घालून एकत्र करून घ्या. सगळ मिश्रण ऐकजिव केल्यानंतर त्यावर कोथिंबीर घाला.

तर तुमचा मखाणा चाट तयार आहे. या पौष्टीक आहाराचं सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि कोलेस्टेरॉल नियंत्रीत ठेवतं.

VIEW ALL

Read Next Story