टीव्हीच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पोहचलेले कलाकार :

आज जागतिक टेलिव्हिजन दिनानिमित्त आपण अश्या काही कलाकारांबद्दल जाणून घेऊया जे टीव्हीमधून बाहेर पडले आणि बॉलीवूडमध्ये चमकले.

Nov 21,2023

शाहरुख खान बनला पहिला टीव्ही हिरो :

या यादीत शाहरुख खानचे नाव प्रथम येणार आहे कारण आज बॉलिवूडचा किंग खान त्याच्या ऍक्टिंगने त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे.


शाहरुखच्या करिअरची सुरुवात टीव्हीपासूनच झाली आहे ज्यामध्ये शाह रुखने फौजी, सर्कस आणि दिल दरिया या शोमध्ये काम केले होते.

इरफान खान :

इरफान खानने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्यातील भारत की खोज, चाणक्य, चंद्रकांता या त्यांच्या सर्वात प्रसिद्ध मालिका आहेत.

आर माधवन :

सी हॉक्सचे डेप्युटी कमांडंट आणि प्रीत या मालिकांमध्ये आर माधवनने काम केले होते. या मालिका सर्वाधिक लोकप्रिय होत्या.

विद्या बालन :

1995 मध्ये आलेल्या हम पांच या मालिकेत विद्या बालनने पहिल्यांदा काम केलं होतं, हा शो खूप लोकप्रिय झाला होता आणि नंतर मात्र अभिनेत्री चित्रपटांमध्ये गेली.

आयुष्मान खुराना :

अत्यंत प्रसिद्ध असलेल्या कलाकारांमधून एक म्हणजे आयुष्मान खुराना ज्याला आज परिचयाची गरज नाही. पण याआधी त्याने रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक आणि आरजे म्हणून काम केले होते आणि आपल्या करिअरची सुरुवात केली.

मृणाल ठाकूर :

मृणाल ठाकूरही पूर्वी टीव्हीचा एक मोठा चेहरा होती. पण गेल्या काही वर्षांत ती तिच्या कामामुळे बॉलिवूड आणि दक्षिणेतील एक प्रसिद्ध नाव बनली आहे.

सुशांत सिंह राजपूत :

पवित्र रिश्तामधून प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर त्याचे बॉलिवूडशी नाते अतूट झाले.

यामी गौतम :

ये प्यार ना होगा काम या मालिकेमधून यामी गौतमला खूप प्रसिद्धी मिळाली होती. आणि मग तिने चित्रपटांकडे आपला प्रवास सुरू केला.

VIEW ALL

Read Next Story