ती पुन्हा येतेय! मराठी मालिका विश्वातील लाडकी सून करतेय कमबॅक

मालिका आणि प्रेक्षक यांचे नाते अतूट आहे. मालिकेतील पात्रांवर भरभरुन प्रेम करणारे प्रेक्षक मालिका संपताना भावूक झाल्याचंही आपण पाहिलं आहे.

कमबॅक करण्यास सज्ज

आवडत्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर कलाकारांना दुसऱ्या मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. लोकांच्या मनावर राज्य करणारी अशीच एक अभिनेत्री कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे.

तेजश्री प्रधान पुन्हा चाहत्यांच्या भेटीला

होणार सून मी या घरची, अग्गंबाई सासुबाई मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजश्री प्रधान पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

तेजश्रीने दिली गुडन्यूज

तेजश्रीने स्वतःच तिच्या नव्या मालिकेविषयी माहिती दिली आहे. स्टार प्रवाहच्या सोशल मीडिया पेजवरुन याबाबत माहिती दिली आहे.

तेजश्रीची नव्या मालिका

मी येतेय आपल्या लाडक्या स्टार प्रवाहच्या नव्या कोऱ्या मालिकेतून, खास तुमच्या भेटीसाठी, असं तेजश्रीने म्हटलं आहे. तेजश्रीने नव्या मालिकेची घोषणा जरी केली असली तरी नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

मालिकेचे नाव गुलदस्त्यात

तेजश्रीच्या मालिकेचे नाव, वेळ आणि कधी सुरू होणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. पण तरीही तिच्या एका फॅनने कमेंट करत मालिकेचे नाव सांगितलं आहे.

मराठी मिडीयम

एका फॅनने केलेल्या कमेंटनुसार, मराठी मिडीयम असं तिच्या मालिकेचे नाव आहे. तसंच, 21 ऑगस्टपासून ही मालिका रात्री 8 वाजता सुरु होणार आहे, असं दावा करण्यात येतोय.

मालिकेचा प्रोमो

तेजश्रीसोबत अभिनेत्री शुभांगी गोखले यासुद्धा दिसणार आहेत. लवकरच या मालिकेचा प्रोमो रिलीज होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story